भिवंडीत घातपाताचा कट? स्फोटकं जप्त

भिवंडीजवळ एका टेम्पोमधून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. जिलेटिनचे ५३ बॉक्स, १८ बॉक्स डिटोनेटर, फ्यूजचे अठरा बंडल आणि दिडशे किलोग्रॅम अमोनिअम नायट्रेट जप्त करण्यात आले आहेत. पडघा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Updated: Apr 1, 2012, 11:22 PM IST

www.24taas.com, भिवंडी

 

भिवंडीजवळ एका टेम्पोमधून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. जिलेटिनचे ५३ बॉक्स, १८ बॉक्स डिटोनेटर, फ्यूजचे अठरा बंडल आणि दिडशे किलोग्रॅम अमोनिअम नायट्रेट जप्त करण्यात आले आहेत. पडघा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अमित आणि अविनाश वाडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे काहीतरी मोठा घातपात घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसचं पोलिसांच्या सतर्कतने पुढील अनर्थ देखील टळला आहे.

 

भिवंडीमध्ये ही कारवाई केल्याने पोलिसांनी आपला मोर्चा आता भिवंडी आणि ठाणे परिसराकडे लक्ष वळवलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच बीड औरंगाबाद या भागात काही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं तर काही अतिरेक्यांना अटकही करण्यात आली आहे. या पकडलेल्या स्फोटकांचा अतिरेक्यांशी काही संबंध आहे का? या दृष्टीने पुढील तपास करण्यात येत आहे.

 

औरंगाबादमध्ये एटीएसनं अहमदाबाद बॉम्बस्फोटातील वॉन्टेड  अतिरेक्याचा खात्मा काही दिवसापूर्वीच केला होता. तर दोघांना जिवंत पकडण्यात यश आलं होतं. औरंगाबादच्या रोजाबागमध्ये झालेल्या एन्काउंटरमुळं पुन्हा दहशतवाद्यांचे औरंगाबाद कनेक्शन उघड झालं होतं. महाराष्ट्र एटीएसनं केलेल्या कारवाईत संशयित अतिरेकी खलिल खिलजी मारला गेला. तर त्याच्या दोन साथीदारांना जिवंत पकडण्यात यश आलं होतं.