ताडोबात राज ठाकरे, पतंगराव आमने-सामने

गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. तर राज ठाकरेंच्या दौ-यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही आज ताडोबा दौ-यावर जाणार आहेत.

Updated: May 30, 2012, 09:45 PM IST

 www.24taas.com, नागपूर

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या दौ-यावर आहेत. राज ठाकरे नागपूरला पोहोचलेत.

 

गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. तर राज ठाकरेंच्या दौ-यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही आज ताडोबा दौ-यावर जाणार आहेत. त्यामुळे आज ताडोबात राज आणि पतंगराव आमनेसामने असणार आहेत.

 

दरम्यान राज यांच्यासह दौ-यावर असलेल्या मनसे आमदार बाळा नांदगांवकर यांनी पतंगराव कदम यांच्यावर तोफ डागलीय. मौजमजा आणि बदल्यांशिवाय वनमंत्र्यांना कोणत्याही गोष्टीत रस नसल्यानं जंगलाची दूरवस्था झाल्याचा आरोप नांदगावकरांनी केलाय.