अनाथआश्रमातील १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

अनाथआश्रमात राहणाऱ्या मुलीसुद्धा आता सुरक्षित नाही असचं दिसून येते, कारण की पुण्यामध्ये अनाथआश्रमात बलात्कारासारखे प्रकार घडत आहे. त्यामुळे अनाथआश्रमात देखील मुलीची सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.

Updated: Nov 24, 2011, 04:55 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

अनाथआश्रमात राहणाऱ्या मुलीसुद्धा  आता सुरक्षित नाही असचं दिसून येते, कारण की पुण्यामध्ये अनाथआश्रमात बलात्कारासारखे प्रकार घडत आहे. त्यामुळे अनाथआश्रमात देखील मुलीची सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.

पुणे जिल्ह्यात कामशेत जवळ विद्यावती अनाथाश्रमातल्या ४५ अल्पवयीन मुलांची नावं बदलण्याचा प्रकार घडला. त्यांच आडनाव बदलून अग्रवाल हे नाव लावण्यात आलं. त्यामुळं खळबळ उडाली. यात २३ मुली २२ मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुलं खंडाळ्याच्या ज्या शाळेत शिकत होती तिथं हा प्रकार उघड झाला.

तसंच आश्रमातली एक १४ वर्षाची मुलगी गर्भवती असल्याचा प्रकारही घडला. मात्र हा बलात्कार १२ वर्षाच्या मुलानं केल्याचं अनाथाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात येतं. या मुलावर खापर फोडण्याचा प्रकार सुरु आहे. या प्रकरणी आश्रमाकडून कुठलीही माहिती दिली जात नाही. तसंच आश्रमाचा संचालक राजेश गुप्ता आणि व्यवस्थापक अशोक घाडगे दोघेही गायब आहेत.  त्यामुळं गुढ आणखी वाढलं आहे.