www.24taas.com, सोलापूर
सोलापुरातल्या एका उच्च शिक्षित तरुणानं संत तुकारामांची 1000 पानांची गाथा आपल्या सुंदर आणि सुवाच्च अक्षरात लिहली आहे. या माध्यमातून संतांची शिकवण तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचा ध्यास त्यानं घेतलाय..
मोत्यांसारख्या सुंदर आणि देखण्या अक्षरात अभिजित भडंगे या तरुणाने सुमारे हजार पानांची तुकाराम गाथा लिहली आहे. सोलापुरातल्या बाळीवेस भागात राहणाऱ्या अभिजीतनं गेल्या नऊ वर्षात साडेचार हजार अभंग लिहिले आहेत. ‘तुकाराम गाथा’ लिहण्याच्या ध्येयानं पछाडलेल्या अभिजीतनं यांत कोणत्याही कारणामुळे खंड पडू दिला नाही.
तुकाराम गाथा लिहिताना अनेक नवनवीन गोष्टी अभिजीतनं अनुभवल्या. कॉन्व्हेंट शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अभिजीतच्या मराठीतल्या देखण्या अक्षरातली तुकाराम गाथा पाहून अनेकजण कौतुक करतात. संतांची शिकवण आणि त्याचं आजच्या युगातलं महत्व तरुणांना पटवून देण्याचा अभिजीतचा मानस आहे..