तुरुंग महानिरीक्षक पवार निलंबित

येरवडा जेलमध्ये कातिल सिद्दीकी या संशयित अतिरेक्याच्या हत्याप्रकरणी तुरुंग महानिरीक्षक प्रकाश पवार यांच्यासह चारजण निलंबित करण्यात आलेत. निलंबित इतर कर्मचा-यांमध्ये तुरुंग अधिकारी चंद्रकिरण तायडे आणि एस. जाधव आणि आर. अवघडे यांचा समावेश आहे.

Updated: Jun 18, 2012, 11:51 AM IST

www.24taas.com, पुणे

येरवडा जेलमध्ये कातिल सिद्दीकी या संशयित अतिरेक्याच्या हत्याप्रकरणी तुरुंग महानिरीक्षक प्रकाश पवार यांच्यासह चारजण निलंबित करण्यात आलेत. निलंबित इतर कर्मचा-यांमध्ये तुरुंग अधिकारी चंद्रकिरण तायडे आणि एस. जाधव आणि आर. अवघडे यांचा समावेश आहे.

मोहंम्मद उर्फ कातिल सिद्दीकी याची येरवडा जेलमधील सर्वात सुरक्षित अशा अंडा सेलमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी प्रकाश मोहोळ आणि अलोक भालेराव या दोघांना अटक करण्यात आलीये. जेलमधील सुरक्षित अशा अंडा सेलमध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपीची हत्या झाल्यानं खळबळ माजली होती.

या हत्येचा हेतू अद्यापही स्पष्ट झालेला नाही. या हत्येला तुरुंग प्रशासनाचा निष्काळजीपणाही कारणीभूत होता. त्यामुळंचं या प्रकरणी तुरुंग महानिरीक्षक यांच्यासह चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलयं.