पुण्यात सध्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. पुण्यात सध्या चाळीस हजारांवर भटके कुत्रे आहेत. आणि या चाळीस हजार कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेकडे फक्त एकच कर्मचारी आहे. पुण्यात सध्या कुत्रे उदंड झालेत. दिवसा उनाडक्या करणारे हे कुत्रे रात्री भुंकून भुंकून हैदोस घालतात. पिसाळलेले आणि आजारी कुत्रे नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरतायत. पुण्यात सध्या सुमारे चाळीस हजार भटके कुत्रे आहेत. आणि त्यांना पकडण्यासाठी फक्त एकच प्रशिक्षित कर्मचारी आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी केली जाते. मात्र प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आतापर्यंत फक्त सुमारे साडे तीन हजार कुत्र्यांचीच नसबंदी करण्यात आलीय.
महापालिकेच्या स्थायी समितीत या विषयावर चर्चा झाली. त्यानुसार प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत. पुण्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान तब्बल ८ हजार जणांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्यात. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. त्यामुळे कुत्र्यांना वेळीच आवर घालणं अत्यंत गरजेचं झालंय.