www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला एक भक्तानं हि-याचे डोळे अर्पण केले आहेत. डॉ. चंद्रशेखर चव्हाण असं या भाविकाचं नाव आहे. त्यांनी दान केलेल्या डोळ्यांमध्ये 18 हिरे बसवण्यात आले असून ते सर्व सोन्यानं मढवण्यात आलेत. तर डोळ्यांच्या पांढ-या भागासाठी हाय डेंसीटी प्लास्टिकचा वापर करण्यात आलाय. या डोळ्यांची किंमत 4 लाखांपेक्षाही जास्त आहे.
डॉ. चव्हाण हे स्वत: डोळ्यांचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी अमेरिकेत डोळ्यांमध्ये दागिने बसवण्याचं संशोधन केलं असून भारतात आपला व्यवसाय सुरू करण्याआधी महालक्ष्मीला डोळे अर्पण केले.
[jwplayer mediaid="51323"]