मनसेने केला कलमाडींचा निषेध

पुणे महापालिकेत सुरेश कलमाडी यांच्या प्रवेशावरुन भाजप आणि मनसेनं गोंधळ घातला. नगरसेवकांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करत कलमाडींचा निषेध केला.

Updated: Jun 11, 2012, 06:26 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुणे महापालिकेत सुरेश कलमाडी यांच्या प्रवेशावरुन भाजप आणि मनसेनं गोंधळ घातला. नगरसेवकांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करत कलमाडींचा निषेध केला.

 

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या खासदार सुरेश कलमाडींच्या महापालिका प्रवेशाला मनसे आणि भाजपनं विरोध करत महापालिका परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. तर कलमाडी महापालिकेत आले तेव्हा त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. त्यामुळं तिन्ही पक्षांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला.

 

तब्बल दोन वर्षांनंतर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी महापालिकेत आले. कलमाडींना कॉमन वेल्थ घोटाळा प्रकऱणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलय. त्यामुळं महापालिकेत त्यांच्या सोबत कोण उपस्थित राहणार याकडं लक्ष लागलं होतं.

 

कलमाडी गेल्या वर्षभरापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र ते पडद्यामागून सूत्रं हलवतंच होते. त्यामुळं आजचा त्यांचा महापालिकेतला प्रवेश म्हणजे पुण्याच्या राजकारणात कमबॅक असल्याचं बोललं जातय. दरम्यान, मनसे, भाजपनं कलमाडींचा निषेध केला.