www.24taas.com, अहमदनगर
दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. दरोड्यातील मुख्य सूत्रधार विक्रम भोसले याला पोलिसांनी अटक केलीय. विक्रम भोसलेसह नवनाथ भोसलेची 11 मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीये. तर या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी कविता काळेलाही 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
अहमदनगर जिल्ह्यातल्या घोसपुरी गावात राहणारा विक्रम भोसले त्याची पत्नी खैराबाई भोसले, मुलगा नवनाथ आणि कैलास भोसले असे एकाच कुटुंबातील चौघे जण या गुन्ह्यात आरोपी आहेत. तर विज्या काळे, कविता काळे आणि छोटू उर्फ सतीश काळे हेही एकमेकांचे नातेवाईक असलेले तिघे जण या गुन्ह्यात आरोपी आहेत.
नवनाथ भोसले, कैलास भोसले या दोघा भावांसह विज्या काळे याने दिवेआगरमधून मूर्तीची चोरी केली होती. त्यानंतर ही मूर्ती अहमदनगर जिल्ह्यातल्या घोसपुरीत नेण्यात आली. त्यानंतर ती मूर्ती वितळविण्यात आली. अहमदनगरच्या आनंदराव मोकर आणि अजित डहाळे या दोन सराफांना ही मूर्ती विकण्यात आली.