www.24taas.com, मुंबई
महागाईनं हैराण झालेल्या सर्वसामान्यांना कर रचनेतील बदलामुळं आणखी एक दणका बसलाय. राज्यांत पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ झालीय. महाराष्ट्रासह सात राज्यांतील जनतेला ही दरवाढ सोसावी लागणार आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल ९१ पैशांनी तर डिझेल ८९ पैशांनी महागलंय. राज्य सरकारच्या करांतील फेररचनेमुळं ही दरवाढ झालीय. सोमवारी मध्यरात्रीपासून देशभरात पेट्रोलची दरवाढ झाली होती. पेट्रोल ७० पैशांनी महागलं होतं. त्यानंतर लगेच दोन दिवसांनंतर राज्य सरकारकडून पेट्रोल ९१ पैशांनी महागल्यानं वाहनधारकांना पेट्रोलसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.
ही दरवाढ कर फेररचनेमुळं झाल्याचं पेट्रोल डिलर असोसिएशनकडून सांगण्यात आलंय. याशिवाय राज्य सरकारच्या करांमुळं स्वयंपाकाचा गॅसही महागणार आहे. अर्थातच गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.