www.24taas.com, न्यू यॉर्क
ऑनलाईन एनसायक्लोपिडीया विकीपीडिया अमेरिकन काँग्रेसच्या पायरसी रोधक विधेयकाच्या विरोधात आज २४ तासांसाठी वेबसाईट बंद ठेवणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार “जर विधेयक मंजूर झालं तर, या ‘विध्वंसकारी’ कायद्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येईल आणि जगभरातल्या वेबसाईट्सवर सेंसॉरशिप बसेल." विकीपीडियाचे जनक, विकीमीडिया फाऊंडेशनचे फाऊंडर जे. वॉल्श यांनी म्हटलं. अमेरिकन सिनेटच्या प्रस्तावित कायद्याच्या विरोधात उद्या २४ तासांसाठी विकीपिडीयाची इंग्लिश भाषेतली साईट बंद ठेवण्यात येणार आहे. विकीपीडियाची इंग्लिश साईट दिवसाला सरासरी २५ दशलक्ष लोक पाहतात. या साईटवर लोकांना क्तपणे ज्ञान वाटता येतं आणि मिळवताही येतं. त्यामुळे २४ तास साईट बंद ठेवल्यामुळे सगळ्यांचीच गैरसोय होणार आहे.
येणारा कायदा इंटरनेटच्या मुक्त व्यवस्थेला संपवून टाकेल. सेंसॉरशिपच्या कायद्याला विकीपिडीयाबरोबरच फेसबुक, गुगल या साईट्सनीही विरोध केला आहे.