तंत्रज्ञानामुळे बदलेल जगण्याचे तंत्र- गुगल

तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत असल्याने सायन्स फिक्शन प्रत्यक्षात येईल असं भाकित गुगलचे कार्यकारी अध्यक्ष इरिक श्मिड्ट वर्तवलं आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे चालक विरहित गाड्या, दिमतील छोटे रोबोट तसंच घर बसल्या बाहेरच्या जगाचा अनुभव लोकांना घेता येणार आहे.

Updated: Feb 29, 2012, 05:48 PM IST


www.24taas.com
, बार्सिलोना

 

 

तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत असल्याने सायन्स फिक्शन प्रत्यक्षात येईल असं भाकित गुगलचे कार्यकारी अध्यक्ष इरिक श्मिड्ट वर्तवलं आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे चालक विरहित गाड्या, दिमतील छोटे रोबोट तसंच घर बसल्या बाहेरच्या जगाचा अनुभव लोकांना घेता येणार आहे. श्मिड्ट म्हणाले कि ऑनलाईन पुस्तकांची उपलब्धता, भाषांचे इटरनेट भाषांतर आणि कम्युटरद्वारा व्हॉईस रेकगनिशन हे वेगाने प्रत्यक्षात आलं आणि तंत्रज्ञान संशोधन याआधी पेक्षा कितीतरी अधिक वेगाने विकसीत होत आहे.

 

बार्सिलोनातील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये श्मिड्ट हजारो उपस्थितांसमोर म्हणाले की, स्वंयचलित गाड्या लवकरच सत्यात अवतरतील. जगातील सर्वात मोठा सेलफोन ट्रेड शो अशी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसची ओळख आहे. श्मिड्ट मागच्या वर्षी गुगलचे चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून पायउतार झाले पण ते आजही कंपनीचा चेहरा आहेत. गुगलच्या सीईओपदी असताना त्यांनी दीर्घकालीन द्रष्टेपणाचा परिचय दिला नव्हता. लोकांना घरबसल्या रॉक कन्सर्टचा अनुभव घेता येणार आहे आणि आवाज अधिक असला तर तो कमी देखील करता येईल अशा स्वरुपाचे संशोधन सध्या प्रगतीपथावर असल्याचं श्मिड्ट यांनी सांगितलं.

 

यावेळेस उपस्थितांपैकी एका महिलेने यामुळे मानवी चेहरा हरवून जाईल अशी भीती व्यक्त केली तेंव्हा श्मिड्ट यांनी हातातला मोबाईल फोन उंचावून दाखवला आणि म्हणाले की तो बंद करणं आपल्या हातात आहे. गुगल गेली अनेक वर्षे चालक विरहित गाड्यांच्या चाचण्या घेत आहे. गुगलच्या गाड्यांनी आतापर्यंत चाचण्यांद्वारे दोन लाख मैल म्हणजे जवळपास सव्वा तीन लाख किलोमिटर्सचे अंतर कापलं आहे.

 

गुगलने विकसीत केलेली चालक विरहित स्वंयचलित कार रडार आणि सेन्सरचा वापर करते. नेवाडाचे गर्व्हनर यांनी जुलै महिन्यात स्वंयचलित टोयोटा प्रायस गाडीतून सफर देखील केली. अमेकितेच अनेक राज्यात कायद्यांमध्ये त्याकरता बदल करण्यात येत आहेत. रस्त्यावर चालक विरहित गाड्यांच्या चाचणीस परवानगी देणारे नेवाडा पहिले राज्य आहे.

 

कामात व्यस्त असणारी लोकं त्यांच्या ऐवजी कार्यक्रमांना रोबोट पाठवून आपली उपस्थिती नोंदवू शकतील. तसंच जगात जिथे असंतोष, उद्रेक किंवा हुकुमशाही आहे अशा जोखमीच्या ठिकाणीही रोबोट पाठवता येतील. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांची मदतीची हाक जगभरात पोहचू शकेल आणि संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतील.