पृथ्वीचा 'मंगळ' योग

पाच मार्च रोजी आकाशात लालेलाल चमकणार मंगळ पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणार आहे. हिवाळ्यात साधारणतः मंगळ आकाशात पूर्वेकडे चमकताना दिसत असतो. तो लालसर तेजस्वी असतो.

Updated: Mar 3, 2012, 03:43 PM IST

www.24taas.com, मुंबई

पाच मार्च रोजी आकाशात लालेलाल चमकणार मंगळ पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणार आहे. हिवाळ्यात साधारणतः मंगळ आकाशात पूर्वेकडे चमकताना दिसत असतो. तो लालसर तेजस्वी असतो.

सायंस पॉप्युलराइझेशन असोसिएशन ऑफ कम्युनिकेटर्स अँड कम्युनिकेटर्सचे सीबी भूषण देवगण यांनी सांगितले की, रात्र मंगळाचा लालसर प्रकाश इतर ताऱ्यांच्या प्रकाशाहूनहू जास्त लक्षवेधी ठरेल. रंगाने लाल असल्यामुळे मंगळ नेहमीच इतर ग्रह ताऱ्यांपेक्षा वेगळा दिसतो. मध्यरात्री तर याचा प्रकाश आणखी वाढेल.

मंगळ हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे. पण ५ मार्चच्या रात्री त्याच्या परिभ्रमणाची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेजवळ येणार असल्याने मंगळ हा इतर वेळेपेक्षा जास्त जवळ दिसणार आहे. हा साध्या ळ्यांनाही सहज दिसू शकत असल्याने यासाठी कुठल्याही दुर्बिणीची वा टेलिस्कोपची गरज नाही.