ग्रास कोर्टवर अव्वल टेनिसपटू आमने-सामने

मातीच्या कोर्टवरील लढाईनंतर आता अव्वल टेनिसपटू ग्रास कोर्टवर आमने-सामने येणार आहेत. नोव्हा जोकोविच, राफाएल नादाल आणि रॉजर फेडरर यांच्यामध्ये खर युद्ध रंगणार आहे. तर ग्लॅमरस मारिया शारापोव्हा सेंटर कोर्टचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भारतीय टेनिसपटूंच्या कामगिरीवरही सा-यांचच लक्ष असणार आहे.

Updated: Jun 25, 2012, 06:06 PM IST

www.24taas.com, लंडन

 

मातीच्या कोर्टवरील लढाईनंतर आता अव्वल टेनिसपटू ग्रास कोर्टवर आमने-सामने येणार आहेत. नोव्हा जोकोविच, राफाएल नादाल आणि रॉजर फेडरर यांच्यामध्ये खर युद्ध रंगणार आहे. तर ग्लॅमरस मारिया शारापोव्हा सेंटर कोर्टचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भारतीय टेनिसपटूंच्या कामगिरीवरही सा-यांचच लक्ष असणार आहे.

 

अव्वल सीडेड नोव्हाक जोकोविच, द्वितीय मानांकित राफाएल नादाल, तिस-या स्थानी असलेला रॉजर फेडरर आणि फॉर्थ रँकड् अँडी मरे विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर विजेतेपदासाठी झुंज देतील. या चार टेनिसपटू विम्बल्डनमध्ये सेंटर ऑफ अट्रँक्शन ठरणार आहे. या चारही सीडेड टेनिसपटूंना पहिल्या राऊंडमध्ये जिंकण्यासाठी फारसे कष्ट पडणार नाहीत. मेन्स सिंगल्समध्ये नेहमीच पहिले चार टेनिसपटू सेमी फायनलला पोहचतात. फ्रेंच ओपन जिंकणा-या राफाएल नादालचं क्वार्टर फायनलपर्यंतचं आव्हान सोप आहे.

 

सेमी फायनलमध्ये त्याची गाठ अँडी मरेशी पडण्याची शक्यता आहे. त्याला थेट फायनलमध्येच नोव्हाक जोकोविच अथवा रॉजर फेडररचं आव्हान परतवून लावाव लागणार आहे. तर वर्ल्ड नंबर जोकोविचला पहिल्या राऊंडमध्ये ज्युआन कार्लोस फरेरोचं आव्हान मोडित काढाव लागणार आहे.

 

तर रॉजर फेडररचा सामना स्पेनच्या अर्ल्बर्ट रामोसशी होणार आहे. तर मारिया शारापोव्हाची सलामीची मॅच ऍनास्तेशिया रोडीनोव्हाशी आहे. जगातीस सर्वात श्रीमंत असलेल्या या स्पोर्टस वूमनलाच विजयासाठी दावेदार मानलं जातंय.

 

भारतीय टेनिसपटूंकडूनही विंम्बल्डनमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र, मेन्स सिंगल्स ख-याअर्थानं टेनिसप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. फेडररला सातव्यांदा अंजिक्यपद पटकावण्याची संधी आहे. तर नोव्हाक जोकोविचसमोर आपलं टायटल डिफेंड करण्याचं आव्हान असेल. तर क्ले कोर्टचा बादशहा राफाएल नादाल ग्रास कोर्टवर आपली जादू दाखण्यास आतूर असणार आहे. त्यामुळे टेनिसप्रेमींना पुढील काही दिवस टेनिसची जबरदस्त ट्रीट मिळणार हे नक्की.