www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय टेनिस टीमची आज घोषणा करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पेस विरुद्ध भूपती-बोपन्ना वादाचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.
भारतीय टेनिस संघटना ऑलिंपिकसाठी कोणती टीम निवडते याची सर्वांनाचा उत्सुक्ता लागलीय.ऑलिम्पिकसाठी पेसला पाठववण्यास टेनिस संघटना ठाम आहे. मात्र दोन जोड्या खेळविण्याचा प्रस्तावदेखील त्यांच्याविचारधीन आहे...एकूणच टेनिस डबल्सचा वादानंतर टेनिस संघटना टीमची निवड कशी करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
भूपती, बोपन्नानंतर आता पेसनं भारतीय टेनिस संघटनेविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावलाय...आता लिएंडर पेसनं ऑलिंपिकमध्ये न खेळण्याची धमकी दिलीय.याबाबत त्यानं AITAला पत्रही लिहिलं आहे.भूपती आणि बोपन्नाचं कौतुक पुरे झाल्याचही त्यानं स्पष्ट केलं....ऑलिंपिकमध्ये कमी रँकिंगच्या प्लेअरसोबत खेळण्यासही त्यानं नकार दिलाय.
बोपन्ना आणि भूपतीनं पेससोबत डबल्समध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर AITA ऑलिंपिकला दोन टीम्स पाठवण्याचा विचार करत असल्याची चर्चा होती...तर पेससोबत युवा विष्णूवर्धनंला खेळवण्यात येणार असल्याची चर्चा होती... मात्र पेसनं आपलल्याला योग्य पार्टनर न मिळाल्यास ऑलिंपिकमधून माघार घेवू असा इशाराच दिला...
भारतीय टेनिस संघटनेने दिलेल्या पाच पर्यांय.
1. पर्याय पहिला...
महेश भूपती आणि लिएंडर पेसने आपापासतले मतभेद विसरून देशहितासाठी लंडन ऑलिम्पिकमध्ये एकत्र खेळावं.
2. पर्याय दुसरा
लिएंडर पेससह रोहन बोपन्नाने ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करावं..
3. पर्याय तिसरा
लंडनला दोन टीम्स पाठवाव्यात
पहिली महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांची तर दुसरी टीम लिएंडर पेस आणि ज्युनिअर टेनिस प्लेअर असणार
4. पर्याय चौथा
लिएंडर पेसने ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास नकार दिल्यास अथवा माघार घेतल्यास, महेश भूपती आणि रोहन बोपन्नाने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळावं
5. पाचवा पर्याय
लिएंडर पेसने युकी भांब्रीसारख्या ज्युनिअर प्लेअर्ससह लंडनला जावं आणि टेनिस संघटनेच्या निर्णयाचा अपमान केल्याबद्दल भूपति-बोपन्नाला ऑलिम्पिकला न पाठवणे