मी ऑलिम्पिकला जाणार म्हणजे जाणार- कलमाडी

पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुरेश कलमाडींनी केली आहे. माकन यांच्या वक्तव्यानं धक्का बसल्याचंही कलमा़डींनी म्हटलं आहे.

Updated: Jul 14, 2012, 10:16 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुरेश कलमाडींनी केली आहे. माकन यांच्या वक्तव्यानं धक्का बसल्याचंही कलमा़डींनी म्हटलं आहे.  माकन यांना क्रीडा क्षेत्राच्या कामकाजाचा अनुभव नसल्याचा टोलाही कलमाडींनी लगावला आहे. तसंच लंडन ऑलिम्पिकला उपस्थिती लावणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

इंडियन ऑलिम्पिकचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना ऑलिम्पिकचं निमंत्रण कोणी दिलं, याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कलमाडी हे भारतीय डेलिगेशनचा हिस्सा असू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन काऊन्सिलचे सदस्य असून आपल्याला लंडनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका सुरेश कलमाडी यांनी सीबीआय कोर्टाकडे केली होती.

 

या याचिकेला हिरवा कंदील दाखवत दिल्ली कोर्टानं कलमाडींना २६ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान कलमाडींना लंडन ऑलिम्पिकला जाण्यासाठी शुक्रवारी परवानगी दिली होती. पण, सुरेश कलमाडी यांना कोणी निमंत्रण दिलं, याबाबत चौकशी करणार असल्याचं क्रीडामंत्र्यांनी म्हटलं.