वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत

वेस्ट इंडिजची पहिली इनिंग केवळ १५३ रन्सवरच गडगडली. अजूनही वेस्ट इंडिज ४७८ रन्सने मागे आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला आहे. फॉलोऑन साठी आलेल्या वेस्ट इंडिजची सुरवात पुन्हा एकदा खराब झाली. उमेश यादवने पहिली विकेट घेत वेस्ट इंडिजला जबरदस्त धक्का दिला

Updated: Nov 16, 2011, 07:36 AM IST
झी २४ तास वेब टीम, कोलकाता

 

वेस्ट इंडिजची पहिली इनिंग केवळ १५३ रन्सवरच गडगडली. अजूनही वेस्ट इंडिज ४७८ रन्सने मागे आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला आहे. फॉलोऑन साठी आलेल्या वेस्ट इंडिजची सुरवात पुन्हा एकदा खराब झाली. उमेश यादवने पहिली विकेट घेत वेस्ट इंडिजला जबरदस्त धक्का दिला. त्यामुळे वेस्ट इंडिज आता नक्कीच पराभवाच्या छायेत आला आहे. टीम इंडियाच्या बॉलर्सनी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्येच विंडिज बॅट्समन्सना आपल्या भेदक बॉलिंगचा दणका दिला.

 

तिसऱ्या दिवशी २ आऊट ३४ वरून पुढे इनिंगला सुरूवात करणाऱ्या विंडिजला तिसऱ्या दिवशी पहिला धक्का दिला तो ओझानं, त्याने एडवर्ड्सला आऊट केलं. त्यानंतर विंडिजच्या इनिंगला गळतीच लागली. आणि त्यांचे बॅट्समन्स केवळ पिचवर हजेरी लावण्याचं काम करू लागले. भारतातर्फे प्रग्यान ओझाने ४ ,उमेश यादवने ३ विकेट्स, तर आर. अश्विनने २ विकेट्स घेतल्या. भारताकडे पहिल्या इनिंगमध्ये ४७८ रन्सची आघाडी आहे.

 

टीम इंडियाच्या ६३१ रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अतिशय खराब झाली. काल दिवस अखेर २ आऊट ३४ रन्स या स्कोर वरुन पुढे खेळताना विंडिजला आणखी दोन धक्के देण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सनां यश आलं. विंडिजची पूर्ण टीम  १५३ वर पॅव्हेलियनमध्ये परतली. आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांच्या फिरकीने महत्त्वाचे बॅट्समन्स के. एडवर्डस आणि चंद्रपॉल यांना पेवेलियन मध्ये परत धाडलं. एडवर्डस 16 तर चंद्रपॉल फक्त 4 रन्स वरच परतले.