[caption id="attachment_589" align="alignleft" width="300" caption="सचिनच्या सूचनांना आयसीसीची ‘ना’"][/caption]
झी 24 तास वेब टीम, कोलंबो
वन डे क्रिकेट इंटरेस्टिंग करण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. सचिनने वन डे क्रिकेट मध्ये काही बदल करण्यासाठी आयसीसी समोर प्रस्ताव मांडला होता. आयसीसीचे सीईओ हारून लोगार्ट यांनी मात्र या सूचना आणि प्रस्ताव अमान्य केल्या आहेत.
टी-20 सामन्यांनी क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला.. या नवीन क्रिकेट फॉरमॅटने क्रिकेट प्रेक्षकांना अक्षरश: भुरळच घातली होती. मात्र यामुळे असल्ल कसोटी क्रिकेट हे संपुष्टात येईल असा अनेकांनी टाहो फोडला. टी-20 मुळे कसोटी, वन-डे क्रिकेट यांची मोहिनी मात्र कमी झाली हे मात्र नक्की. यासाठीच वन डे क्रिकेटचा दबदबा कायम राहण्यासाठी सचिन तेंडुलकर सारख्या महान फलंदाजाने आयसीसी समोर प्रस्ताव मांडला होता.
वन डे सामन्यांमध्ये ५०-५० ओव्हरच्या दोन इनिंग खेळण्याऐवजी २५ ओव्हरच्या चार इनिंग खेळवावेत, अशी सूचना सचिनने केली होती. कसोटी, वनडे, टी-२० या क्रिकेटच्या तीनही प्रकारांना प्रेक्षकांनी पसंती द्यावी म्हणूनच मी हे विचार मांडत आहे, असं सचिनने पत्रात म्हटलं होतं.
"वन डे सामन्यात चुरस निर्माण करण्यासाठी मी हे विचार मांडत आहे. पावसामुळे बऱ्याच वेळा सामन्याचा निकाल हा नाणेफेकीचा कौल पाहून घेतला जातो. २५ षटकांच्या डावांमुळे अशा निकालांना आळा बसेल" असं सचिनचं म्हणणं आहे. "सामन्यात दोन पॉवरप्ले असतील, तर प्रत्येक गोलंदाजाला दहाऐवजी बारा षटकं मिळतील" मात्र हरून लोगार्ट यांनी सचिनने सुचवलेले बदल स्वीकार्य नसल्याचं सांगून त्याचा प्रस्ताव फेटाळला आहे.