सेह'वाग' चे पुनरागमन

इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भुईसपाट झालेल्या मनोधैर्य खच्ची झालेल्या भारतीय संघाला आता थोडा दिलासा मिळणार आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज विरेंद्र सेहवाग तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी आज (बुधवारी) संघाला येऊन मिळेल.

Updated: Aug 3, 2011, 08:16 AM IST

झी 24 तास वेब टीम, लंडन

इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भुईसपाट झालेल्या मनोधैर्य खच्ची झालेल्या भारतीय संघाला आता थोडा दिलासा मिळणार आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज विरेंद्र सेहवाग तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी आज (बुधवारी) संघाला येऊन मिळेल.

या कसोटी मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात सेहवागचे नाव होते, परंतु खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरण्यात त्याचे आणखी पंधरा दिवस खाल्ल्याने तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. आता येत्या शुक्रवारी नॉर्दम्प्टन येथे होणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यामध्ये तो खेळताना दिसेल.

दहा ऑगस्टला बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत भारताची नेहमीची आघाडीची जोडी सेहवाग आणि गौतम गंभीरच्या रूपात खेळताना दिसेल अशी आशा आहे. पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेला गंभीर दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता, पण आता तो ठिकठाक झाला असून तिसऱ्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने दिलेय.

Tags: