बीड : स्पर्धेच्या या जीवनात पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. बीडमध्ये 11 वर्षाच्या मुलाने फाशी घेतल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या बहिणी सोबत जेवण करून टीव्ही बघत बसलेल्या चिमूरड्याने अचानक केलेल्या या कृतीमुळे पालकात घबराट निर्माण झाली आहे.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरामधल्या सदर बाजार भागात राहून मोलमजुरी करणा-या शेख वाजेद यांचा तो मुलगा. सोमवारी दुपारी साजेद जेवण करत असताना टीव्हीवर दोघा भावंडांसोबत कार्टून पाहत होता. नंतर दोन्ही भावंडं घराबाहेर गेली आणि काही वेळातच साजेदचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरात आढळून आला.
आपली मुलं टीव्हीवर काय बघतात, कशाचं अनुकरण करतात, यावर पालकांनी लक्ष द्यायची गरज आहे. लहान मुलं अनुकरणशील असतात. त्यामुळे त्यांना जपणं त्यांच्यावर नजर ठेवणं आवश्यक आहे.