www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
देशभरात दिवाळीचा सण साजरी होत असताना सीमारेषेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देणा-या सैनिकांच्या मात्यापित्यांचा सत्कार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शिवसेनेतर्फे करण्यात आला.
महाराष्ट्रातील पाचोरा तसच भडगाव तालुक्यात सर्वाधिक २५०० सैनिकांची फौज देशाच्या सीमेवर तैनात आहे. या सैनिक कुटुंबियांचा साळी चोळी सन्मानचिन्ह देण्याचा सोहळा शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आला. सैनिक कुटुंबातील सुमारे ५ हजार सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते.
सीमारेषेवर शत्रूशी झुंज देताना पाचोरा तसच भडगाव तालुक्यातील आतापर्यंत १५ सैनिकांना वीरमरण प्राप्त झालय अशा कुटुंबियांना सत्कारासोबातच ५ हजारांचा धनादेशहि यावेळी देण्यात आला.
विशेष म्हणजे सेनेच्या ताब्यात असलेल्या पाचोरा तसच भडगाव पालिकेतर्फे सैनिक कुटुंबियांना कर माफ करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे.
सैनिक पुत्र शहीद झाल्यानंतरच सरकारकडून सैनिक कुटुंबियांचा सन्मान होतो त्यामुळे या वातावरणात भारवलेल्या सैनिक मातांना यावेळी आपले अश्रू अनावर झाले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.