www.24taas.com ,झी मीडिया, लातूर
बापाला लाज आणणारी घटना लातूरमध्ये नऊ दिवसानंतर उघड झाली आहे. पोटच्या मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या बापालाच तिने धडा शिकवला.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव येथील राजेश (नाव बदलले आहे) याचा दगडवाडी शिवारातील एका विहिरीत २३ सप्टेंबर रोजी मृतदेह आढळला होता. या प्रकरणी प्रारंभी लातूर ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासावरून भयानक वास्तव पुढे आले. पोटच्या मुलीनेच बापाचा काटा साथीदारांच्या मदतीने काढण्याचे पुढे आले. बापाची हत्या केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. मुलीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिले आहे.
सातत्याने राजेश हा मुलींचे शोषण करीत असे. स्वत:च्या मुलींशीच बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले होते. याचा राग मुलीला अनावर झाला. संतप्त झालेल्या मुलीने बापाचा कायमचा काटा काढला. ही घटना नऊ दिवसांपूर्वी घडली होती. शोषण करणाऱ्या बापाचा मृतदेह एका विहिरीत आढळला होता. या प्रकरणी प्रारंभी लातूर ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र मृतदेहाला झालेल्या मारहाणीच्या खुणा व बांधलेल्या दगडावरून त्याचा खून झाल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याच रात्री खुनाचा गुन्हा नोंदविला.
प्राथमिक चौकशीत मयत राजेश हा घटनेच्या चार दिवसांपासून गायब असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता १९ सप्टेंबर रोजी तो आपली मुलगी योगिता (नाव बदलले आहे) हिच्यासोबत बोरी येथे दवाखान्यात गेला होता. योगिताची अधिक चौकशी केली असता तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रिक्षाचालकाची चौकशी केल्यानंतर ते दोघे एका शेतासमोर उतरल्याचे समजले. पुन्हा सुलभाची चौकशी केली असता, यावेळी तिने गुन्ह्याची कबुली दिली.
योगिताला कोणताही पश्चाताप झालेला नाही. मी `बाप` नव्हे `साप` ठेचला, असे तिने म्हटले आहे. तर योगिताचे साथीदार हे घटनेच्या दिवशी शेतात थांबले होते. ठरल्याप्रमाणे तिने वडिलांना सायंकाळी शेतात नेले. या ठिकाणी सर्वांनीच त्यास मारहाण करून विषारी द्रव पाजले. त्यानंतर गळा दाबून मोहन याचा खून केल्याचे उघड झाले. दरम्यान, मृतदेहाचे कपडे काढून तो विहिरीत टाकला. त्यानंतर योगिताने बापाचे कपडे घरी आणून रात्री ते चुलीत जाळले, असे पोलीस तपासात उघड झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.