मुंबई : अनेक गोष्टी अशा असतात ज्या शास्त्रामध्ये घरात ठेऊ नये असं सांगतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या शास्त्रांमध्ये अशूभ मानल्या जातात. कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्या.
१. ताज महल : आपण ज्या ठिकाणाला भेट देतो तेथील गोष्ट आपण नक्कीच खरेदी करून आणतो. आज अनेक वास्तूंच्या प्रतिकृती बाजारात विक्रीला ठेवल्या जातात. जसं की आयफेल टॉवर, ताज महल, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. या वास्तू घरात कधीच ठेऊ नका. या वस्तू कोणाला गिफ्ट म्हणून ही देऊ नका.
२. कृष्ण आणि अर्जुन एका रथावर : कृष्ण आणि अर्जुन यांचे रथावरील पेंटींग खूप लोकप्रिय आहे. कृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत आणि पाठिमागे कुरुक्षेत्र म्हणजेच युद्धभूमी दिसत आहे. यामुळे याचा नकारात्मक आणि हिंसक वातावरण तयार होतं. त्यामुळे या गोष्टी घरात लावू नये.
३. नटराजची मूर्ती : प्रत्येक नर्तक या मूर्तीला अभिवादन करुन नृत्य करण्यास सुरुवात करतो. नटराजाची ही मूर्ती शंकर देवाचं क्रोधीत रूप आहे. तांडव नृत्य करतांनाचं नटराजचं हे रूप आहे. या नृत्यादरम्यान जग संपविण्याची भीत असते असा समज आहे. त्यामुळे तांडव नृत्य करत असतानाची नटराजाची मूर्ती घरात ठेवू नका.