मुंबई : आज आहे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केल्याने तिची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. त्यासाठी करा खालील कामे
दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूचे स्मरण करा. जेथे भगवान विष्णूचे वास्तव्य असते तेथे लक्ष्मी असते.
श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीची स्थापना पूर्ण मानली जाते.
दिवाळीच्या दिवशी ऊस घरी आणल्याने लक्ष्मीचे आगमन होते.
या दिवशी लक्ष्मीमातेच्या पुजेसह कुबेराचीही पुजा करावी.
लक्ष्मीची पुजा करताना कमळ पुष्प अर्पण करा. लक्ष्मीदेवीला कमळ पुष्प अधिक प्रिय आहे.