www.24taas.com, अलाहबाद
बॉलिवूडमध्ये जरी हॉरर फिल्म्सचे चाहते वाढले असले, तरी भारतीय लोकांना आता प्रत्यक्षात भुतांची भीती वाटेनाशी झाली आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारार्थ करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
राष्ट्रीय विज्ञान संचार आणि सूचना स्त्रोत संस्थान आणि राष्ट्रिय विज्ञान आणि प्रौद्योगिक संचार परिषदेतर्फे महाकुंभ, अर्धकुंभमध्ये वैज्ञानिक जागृती याविषयावर १९८९ सालापासून सर्वेक्षण केलं जातं. या निमित्ताने यंदाही २० फेब्रुवारीपर्यंत ७० सदस्य सर्वेक्षण करणार आहेत.
या सर्वेक्षणाचे प्रमुख गौहर रजा म्हणाल्या, की आधीपेक्षा भारतीय लोकांच्या मनातील भुतांची भीती कमी झाली आहे. उवट जे लोक भुतांवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यातलेही बरेच जण भुतांमुळे काही नुकसान होत नाही, असं म्हणतात. याशिवाय पृथ्वीचा आकार, गुरुत्वाकर्षण यांबाबत जागृती वाढली असल्याचं लक्षात आलं आहे.