www.24taas.com, श्रीनगर
जम्मू काश्मीरच्या पीरपंजाल भागात एका मुस्लिम धनगराने तीन शिवलिंगं, काही प्रतिमा आणि १८९६ सालची जुनी नाणी शोधून काढली आहेत. ३०० फूट लांबीची गुहा या धनगराने शोधली आहे.
काश्मीरमधील मंदिर संरक्षक कमिटीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं, की २००४ साली त्यांनी अशा गुंफेतील मंदिराबद्दल अफवा ऐकलेल्या होत्या. अशा प्रकारचं खरंच मंदिर आहे का हे शोधून काढण्याची जबाबदारी खुर्शीद आलम नामक धनगराला दिली. ही गुंफा शोधून काढणं अत्यंत कठीण काम होतं. नऊ वर्षं कुर्शीद ही गुंफा शोधत होता. अखेर त्याला ही गुंफा आणि तीन संगमरवरी शिवलिंगं आढळली.
खुर्शीदला यासंदरभात विचारलं असता, त्याने उत्तर दिलं की, तो नऊ वर्षं गुंफा शोधत होता. मात्र त्याला यश मिळत नव्हतं. काही महिन्यांपूर्वी एका रात्री स्वप्नात त्याला साक्षात भगवान शंकरांनी दृष्टांत दिला. त्यांनीच मार्गदर्शन केल्यामुळे मला या गुहेचा रस्ता सापडला. राज्याचे पुरातत्त्व अधिकारी ए के कादरी यांनी या जागेची पाहाणी केली असून या जागेला पुरातन स्मारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.