मुंबई : वर्तमानात केलेल्या एकाद्या कार्यामुळे तुम्हाला त्याचे फळ भविष्यात मिळते. मात्र, चुकीचे काम करण्यापासून तुम्ही सतत सावधान राहिले पाहीजे. गरुड पुराण नीतीनुसार काही काम असे सांगितले गेले आहे. तुम्ही भविष्यातील अशुभ काम आधीच नष्ट करु शकता. त्यासाठी या ४ गोष्टी महत्वाच्या आहेत.
१. खराब कपडे वापरु नका, कारण सौभाग्य नष्ट होते
जे लोक धन आणि सर्व सोयी-सुविधांनी संपन्न आहेत. मात्र, ते लोक चांगले कपडे परिधान करतात. त्यामुळे त्यांचे सौभाग्य नष्ट होते. गरुड पुराणात सांगितले आहे की, महालक्ष्मी त्यांचा त्याग करते. त्यांना समाजात सन्मात मिळत नाही. चांगले स्वच्छ कपडे परिधान केलेत आणि सुगंधी वस्त्रामुळे लक्ष्मीची विशेष कृपा दिसते.
२. नेहमी सावध राहा, चतुरता नीती शत्रूवर मात करते
शत्रूंवर मात करण्यासाठी नेहमी चतुरता कामी येते. जर शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असेल मात्र, तुम्ही चतुराई दाखवली नाही तर तुमचेच नुकसान होते. जसा शत्रू असेल त्याप्रमाणे नीतीचा वापर करा आणि शत्रूला नष्ट करा.
३. नेहमी संतुलित आहार घ्या, त्यामुळे रोग नष्ट होतात
अधिकतर आजार हे असंतुलित आहार केल्यामुळे होतात. त्यामुळे सदैव चांगले आणि संतुलित जेवण घेतले पाहिजे. त्यामुळे असे भोजन पचायला चांगले असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पचनामुळे स्वास्थ चांगले राहते आणि आपले आरोग्य ठिकठिक राहते.
४. अभ्यास केला नाही तर विद्या नष्ट होते
तुमची विद्या चांगली निरंतर राहावी, यासाठी अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे अधिक ज्ञान वाढीसाठी सतत वाचन केले पाहिजे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.