१४ ला नाही यंदा १५ जानेवारीला का आहे मकर संक्रांत?

मुंबई : श्रद्धा आणि दानाच्या माध्यमातून पुण्य कमवण्याचा दिवस म्हणून साजरी केली जाणारी मकर संक्रांत यंदा १४ ऐवजी १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. 

Updated: Jan 14, 2016, 08:30 PM IST
१४ ला नाही यंदा १५ जानेवारीला का आहे मकर संक्रांत? title=

मुंबई : श्रद्धा आणि दानाच्या माध्यमातून पुण्य कमवण्याचा दिवस म्हणून साजरी केली जाणारी मकर संक्रांत यंदा १४ ऐवजी १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. 

मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. 

हिंदूंसाठी हा काळ खूप पवित्र असतो. या काळात केलेले दान खूप लाभते, असा समज आहे.  

पण यंदा मात्र हेच उत्तरायण सूर्यास्तानंतर सुरू होणार आहे. पण हिंदू लोक सूर्यास्तानंतर दानधर्म करत नाहीत. म्हणून यंदा मकर संक्रांत १४ ऐवजी १५ जानेवारीला साजरी केली जाईल आणि तेव्हाच दानधर्म केला जाईल.