नवी दिल्ली : प्रत्येक घरात देवासाठी स्वतंत्र अशी छोटीशी जागा असते. नवीन घर घेताना देव्हारा कुठे असावा याचाही विचार केला जातो. मात्र त्याचेही योग्य स्थान असावे. त्यामुळेच मनाला शांती मिळते. देवघर कुठे असावे याचेही काही नियम आहेत.
देवघरातील मूर्तीं नेहमी पूर्व अथवा पश्चिम दिशेला असाव्यात.
मूर्ती कधीही उत्तर अथवा दक्षिण दिशेला तोंड करुन ठेवू नयेत.
बेडरुममध्ये कधीही देवघर बनवू नये
बाथरुम तसेच टॉयटेलजवळ पुजाघर नसावे
देवघरातील मूर्ती समोरासमोर ठेवू नयेत.
नेहमी देवघर स्वच्छ आणि साफ ठेवावे.
नेहमी देवघरात सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावावा