शिवतीर्थावरच अखेरचा निरोप
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शनिवारी दुपारी ३.३३ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या राजकारणात गेली पाच दशके घोंगावणारे वादळ शांत झाले. आज रविवारी बाळासाहेबांना शिवतीर्थावरच सायंकाळी ५ वाजता अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
कसा प्रवेश कराल शिवाजी पार्कवर...
शिवसैनिकांनी जबाबदारीनं वागावं, असं आवाहन शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय. याशिवाय दादर परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आलीय.
मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत `महायात्रा`
एक नेता नेता, एक पक्ष, ४७ वर्षं... असा विक्रम असलेल्या शिवसेनेच्या शिवतीर्थावर, अर्थात शिवाजी पार्कवर आज सकाळी १० वाजल्यापासून बाळासाहेबांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. तिथंच त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला जाईल. सकाळी आठ वाजता मातोश्रीहून शिवाजी पार्ककडे ‘महायात्रा’ निघणार आहे.
साहेबांचे शेवटचे काही दिवस आणि शेवटचा एक तास...
आठवडाभरापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास जाणवू लागला. ` मातोश्री `च्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीतच त्यांच्यावर उपचार सुरू होते.
बाळासाहेबांची पाकिस्तानमध्ये दखल
बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाची दखल घेणा-या पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातमीलाही ठळक प्रसिध्दी दिली आहे. भारतातील लोकप्रिय नेतृत्व, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचे संस्थापक असा उल्लेख बाळ ठाकरे यांच्याबाबत पाकिस्तानी वृत्तपत्रांनी केला आहे.
बाळासाहेबांनी `देह सोडला`... पण `तेज कायम`
आज बाळासाहेबांनी अखेरचा दुपारी ३.३० वा. अखेरचा श्वास घेतला. आणि त्याच्यानंतर उभ्या महाराष्ट्र शोककूल झाला.
बाळासाहेब आणि मीनाताई
१४ जून १९४८ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरला वैद्य यांच्याशी विवाह केला आणि सरला वैद्य मीना ठाकरे म्हणून बाळासाहेबांच्या संसारात आल्या. शिवसेनेतील तमाम शिवसैनिकांसाठी भविष्यात त्या मीनाताई बनल्या.
पोलिसांवरचा ताण वाढला; पोलीस आयुक्तांच्या मुलीचं लग्न रद्द
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे बंद सुरू झालाय. याचाच परिणाम पोलिसांच्या खाजगी जीवनावरही झालाय. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांची मुलगी रिचा हिचं रविवारी होणारं लग्न पुढे ढकललं गेलंय.
मातोश्री... बाळासाहेबांच्या मृत्यूची घोषणा होण्याअगोदर!
बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत दुपारी साडे तीन वाजता मालवल्याचं बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांनी जाहीर केलं. पण ही घोषणा होण्याअगोदर बाळासाहेबांची प्रकृती जास्त बिघडल्यानं मातोश्रीवर बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. हा तणाव उद्धव ठाकरे यांना सहन झाला नाही आणि ते चक्कर येऊन पडले.
बाळासाहेब मी तुम्हाला त्रास दिला - नारायण राणे
बाळासाहेब मला माफ करा. मी खूप त्रास तुम्हाला त्रास दिला आहे, असे पश्चातापाचे उद्गार माजी शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी काढले.
मृत्यूही सांगून आला होता बाळासाहेबांना- लता मंगेशकर
`पैलतीराचा प्रवास सुरू करण्याची वेळ जवळ आली आहे`, असं म्हणतं, बाळासाहेबांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याजवळ त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.
महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी होणाऱ्या प्रज्ञा शोध परीक्षा तसंच सीएच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
रविवारी रिक्षा आणि टॅक्सी बंद
उद्या दादार येथे बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर ठेवण्यात येणार आहे. यावेळी सर्व शिवसैनिकांनी सार्वजनिक वाहनांतून वाहतूक करून यावं असं आवाहन करण्यात आलंय. उद्या मुंबईतील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच मुंबईतील सर्व रिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील रविवारच्या सर्व परीक्षा रद्द
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईत उद्या रविवारी सकाळी बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शोकाकूळ परिस्थिती लक्षात घेवून रविवारच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर रात्री विशेष गाडी
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखा महाराष्ट्रासह देश शोकसागरात बुडाला आहे. कोकणातील शिवसैनिकांसाठी मुंबईत येणाऱ्यासाठी मडगाव ते मुंबई खास रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे रात्री दहावाजता मडगाववरून सुटेल.
बाळासाहेबांसाठी बॉलिवूडने ट्विटरवरून ढाळले अश्रू
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. मुंबईमध्ये तर अघोषित बंद पुकारला गेला आहे. बाळासाहेबांना भेटायला गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत प्रत्येक मातोश्रीवर दाखल होत होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर मायानगरी बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. ट्विटरमार्फत बॉलिवूडने आपली श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
शिवसैनिकांनो `बाळासाहेबां`साठी शांतता राखा- शिवसेना
शिवसेनाप्रमुखाचं पार्थिव सध्या मातोश्रीवर आहे. उद्या सकाळी साधारण ७.३० वा. मातोश्रीवर निघेल. आणि त्यानंतर ते शिवतीर्थावर ठेवण्यात येईल त्यानंतर १० वाजल्यानंतर अंतिम दर्शनासाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात येईल.
रविवारी महाराष्ट्रातील सर्व थिएटर्स बंद
बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्याचं वृत्त समजताच सबंध महाराष्ट्रात बंदसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ मुंबईतलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील थिएटर्स बंद करण्यात आली आहेत. तसंच रविवारीदेखील संबंध महाराष्ट्रातलली सिनेमागृहं बंद ठेवण्यात येणार आहे.
बाळ नावाचा बाप
आज काळाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आपल्यातून हिरावून नेल. स्वतः बाळासाहेब ठाकरे एक विचार आहेत आणि विचार कधीच मरत नाहीत.
बाळासाहेबांच्या आयुष्यातले चढ-उताराचे क्षण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवासावर एक नजर...