उद्या मुंबईत मेगाब्लॉक रद्द, उत्स्फूर्त बंद
उद्या, रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरचा प्रस्तावित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. देशभरातून येणा-या शिवसैनिकांना तसेच सर्वसामान्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्राची मोठी हानी – सचिन तेंडुलकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची मोठी हानी झाली असल्याचेही सचिनने ट्विटरवर म्हटले आहे.
... अन् भुजबळांना अश्रू झाले अनावर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच होते... ते आपल्यात नाहीत ही कल्पनासुद्धा करवत नाही, असं म्हणत छगन भुजबळ भावूक झाले. ते ‘झी २४ तास’शी बोलत होते.
बाळासाहेबांच्या निधनाच्या वृत्तानंतर मुंबई बंद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजतात काही मिनिटात मुंबईतील सर्व व्यवहार बंद झालेत. परळ, दादर, लालबाग, माहिम, गिरगाव अशा मराठीवस्तीच्या भागात शोकाकूळ वातावण होते. येथील वेगाने विविध दुकाने, मॉल्स, बाजार बंद झाले. दरम्यान, सावधगिरीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी मुंबईभरात कडक बंदोबस्त ठेवला होता.
राणेही रडले, `साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही,
`साहेबांची शेवटपर्यंत भेट झाली नाही, याचं शल्य आयुष्यभर मला राहिल`... असं म्हणत माजी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केलं.
... असं घडलं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्वं
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला.
‘साहेबांनी’च करून दिली मराठी अस्मितेची जाणीव...
बाळासाहेब, शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट... एका नावासाठीची ही अनेक विशेषणं... पण त्यातलं सगळ्यात आवडतं आणि हक्काचं म्हणजे `साहेब`... सच्चा शिवसैनिक याच नावानं बाळासाहेबांना ओळखतो... या एका नावानं शिवसैनिकांना जगण्याची ऊर्जा दिली... ताठ मानेनं जगायला शिकवलं आणि जगण्यासाठी लढायला शिकवलं...
हिंदुह्रद्यसम्राट आणि मराठी माणसाची जुळली नाळ...
मराठी माणसाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या प्रश्नांना संघटित रुप मिळालं आणि लढा सुरू झाला... मराठी माणसाच्या हक्कासाठी...
प्रवाहाला छेद देणारा ‘एकटा टायगर’ गेला!
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला.
बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली... आपणही द्या बाळासाहेबांना श्रद्धांजली
हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन
हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे.
शिवसैनिकांना त्रास नको... ऊस आंदोलकांचा 'रास्ता रोको' स्थगित
‘ऊस दराच्या आंदोलनाचं स्वरुप आम्ही बदलतोय, ऊस आंदोलक रास्ता रोको करणार नाही’ अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीय.
बाळासाहेबांसाठी `मला इथेच राहू द्या`- राज ठाकरे
प्रक्षोभक भाषणाप्रकरणी राज ठाकरे यांना २२ डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश नवी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने दिलेत.
बाळासाहेबांच्या नाडीचे, हृद्याचे ठोके व्यवस्थित सुरू
शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणार्या डॉक्टरांनी शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचा निर्वाळा आज सकाळी दिला.
बाळासाहेब लवकरच मार्गदर्शन करतील- रामदास कदम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब लवकरच तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील असा विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यकत केला.
राणेंनी केला उद्धव ठाकरेंना फोन, साहेबांना भेटायचं आहे...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृतीविषीयी समजताच उद्योग मंत्री नारायण राणे यांनाही बाळासाहेबांची भेट घ्यावीशी वाटते आहे.
मियाँदाद यांनी मागितली बाळासाहेबांसाठी दुवाँ!
पाकिस्तानचे क्रिकेटर जावेद मियाँदाद यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून आपण अल्लाकडे दुवा मागितली असल्याचं मियाँदाद यांनी सांगितले.
बाळासाहेब लवकरच दर्शन देतील- राऊत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून कालच्या पेक्षा चांगली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
बाळासाहेबांच्या भेटीसाठी अभिनेत्यांनी लावली रीघ
बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी तसच अनिल देसाईंनी म्हटलयं.
हा `वाघ` कधीच म्हातारा होणार नाही!- अनुपम खैर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे.