बाळासाहेबांच्या `त्या` खोलीत कोणालाच प्रवेश नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने नेतेमंडळींनी `मातोश्री`वर धाव घेतली असली तरी कोणालाही शिवसेनाप्रमुखांवर उपचार सुरू असलेल्या दुसऱ्या मजल्यावर जाणे शक्य झाले नाही.
`साहेब` तुमच्यासाठी कायपण....!
साहेब, तुमच्यासाठी काय पण!... असं म्हणत, अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या `देवा`साठी इतर देवांना मात्र पाण्यात ठेवलं आहे.
अन् शिवसेना भवन पुन्हा उजळले...
बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याने शिवसेना भवन येथे करण्यात आलेली विद्युत रोषणाई पुन्हा सुरू करण्यात आली. बाळासाहेबांची प्रकृती बिघडल्याने ही विद्युत रोषणाई बंद करण्यात आली होती.
शाहरुखने मागितली बाळासाहेबांसाठी दुवा
अभिनेता शाहरुख खानही रात्री उशिरा ‘मातोश्री’वर दाखल झाला. बाळासाहेबांच्या उदंड आयुष्यासाठी मी परमेश्वाराकडे प्रार्थना करतो. दुवा मागतोय. हे युद्ध ते नक्कीच जिंकतील आणि त्यांच्या प्रकृतीला आराम मिळेल असा मला विश्वा स आहे, अशा भावना त्याने ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
आपला `देव` नक्कीच संकटातून बाहेर पडणार - उद्धव
आज दिवसभर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत होतं. यावरच थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांशी संवाद साधत शिक्कामोर्तब केलंय.
देशाला बाळासाहेबांची गरज - अण्णा
‘या देशाला बाळासाहेबांची गरज आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतोय’ अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिलीय.
बाळासाहेबांची प्रकृती सुधारतेय - बाबासाहेब पुरंदरे
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी आई जगदंबेकडे प्रार्थना केली. जगदंबे तुझाच उदय होवू दे, तुझाच उदय होवू दे. आदरणीय बाळासाहेबांची प्रकृती सुधारतेय. तुम्हा आम्हांच्या या तळमळीचा आपल्याला मिळालेला हा परमेश्वरी प्रतिसाद आहे, हे भेटीनंतर शिवशाहीर यांनी सांगितले.
`स्वाभिमानी`नं रोखल्या शिवसैनिकांच्या गाड्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दरवाढीसाठी सुरू केलेलं आंदोलनही अजून थंड झालेलं नाही. या आंदोलनाचा फटका शिवसैनिकांना बसू नये, यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आवाहन केलंय.
बाळासाहेबांची प्रकृती गंभीर, सिनेसृष्टी दिवसभर बंद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी समजताच बॉलिवूडही ओस पडलं. सिने आर्टिस्ट्स आणि इतर संघटनांनी बाळासाहेबांसाठी उस्फुर्त बंद पुकारल्यामुळे आज मुंबईत कुठेही शुटिंग होऊ शकलं नाही.
शिवसेनेचा बालेकिल्ला ओस
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.
बाळासाहेबांची प्रकृती सुधारत आहे – सुभाष देसाई
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहेत. त्यांच्या प्रार्थनेमुळे बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असी माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज मीडियाला दिली.
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर – राज ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या आणि होमहवन सुरू आहेत. याचदरम्यान, पुतणे राज ठाकरे यांनी चागंली बातमी दिली, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.
साहेब, बरे व्हा... महाआरत्या, होमहवन
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या आणि होमहवन सुरू आहेत. प्रार्थना एकच बाळासाहेब यांना आजारातून बाहेर काढ.
शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीच्या बातम्या पाकिस्तानतही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीच्या बातम्यांनी फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांचीही पानं भरली आहेत. इतर वेळी केवळ मुंबईचे आणि महाराष्ट्रातील एक पक्ष संस्थापक मालने गेलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची बातमी बीबीसी सारख्या अव्वल वृत्तवाहिनीनेही दिली आहे.
बाळासाहेबांशी काय बोलावं सुचलंच नाही, शरद पवार भावूक
केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. शरद पवार हे भेटीसाठी `मातोश्री`वर गेले होते.
`संकट आहे, मात्र बाळासाहेब नक्कीच मार्ग काढतील`
शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृतीविषयी साऱ्यांनाच चिंता वाटत असल्याने अनेकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेत आहेत.
बाळासाहेबांच्या आठवणीने मनोहर जोशी गहिवरले...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृती गंभीर असल्याने शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह इतरही नेत्यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती.
बाळासाहेबांच्या प्रकृतीमुळे मी खूप अस्वस्थ - लता मंगेशकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची मला खूप काळजी वाटते आहे, त्यांची मला खूप काळजी वाटत असल्याचे गानकोकीळा लता मंगेशकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट
काल सायंकाळपासून एकच नाव ऐकायला मिळत होते ते बाळासाहेब यांचे. त्यांची कशी आहे प्रकृती? त्यांच्यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करीत आहे. त्याच दरम्यान, मुंबईची गतीही एकदम संत झाली. रात्री दहानंतर मुंबई कासव गतीने धावत होती. ही गती सकाळी जवळपास बंदच झाली. मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. तर दुकानेही उत्स्फुर्त बंद ठेवण्यात आली आहेत.
बाळासाहेबांना भेटण्यासाठी सर्व क्षेत्रांतील दिग्गज `मातोश्री`वर
आज सकाळपासूनच ‘मातोश्री’वर अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींचा बाळासाहेबांच्या भेटीसाठी ओघ सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे देखील बाळासाहेबांना भेटण्यासाठी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी रवाना झाले आहेत.