www.24taas.com, मुंबई
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी आई जगदंबेकडे प्रार्थना केली. जगदंबे तुझाच उदय होवू दे, तुझाच उदय होवू दे. आदरणीय बाळासाहेबांची प्रकृती सुधारतेय. तुम्हा आम्हांच्या या तळमळीचा आपल्याला मिळालेला हा परमेश्वरी प्रतिसाद आहे, हे भेटीनंतर शिवशाहीर यांनी सांगितले.
आज दिवसभर सा-या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान असलेल्या `मातोश्री` बंगल्याकडे. भावूक शिवसैनिकांची गर्दी, राजकीय नेते, सेलिब्रिटींची गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त असंच याचं स्वरुप होतं. उद्योगपती वेणुगोपाल धुत आणि राहुल बजाज यांनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपुस केली, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरें यांनीही त्यानंतर भेट घेतली.
पुरंदरे म्हणालेत, आपण आता एकाच भावनेने भारावलेले आहोत. आपली सर्वांची एकच इच्छा आहे. बाळासाहेब पूर्वीच्याच वेषात आणि जोशात आपल्या पुढे यावेत आणि त्यांनी आपल्याला आज्ञा करावी. त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत. हे नक्की घडेल, हे नक्की घडेल. मी आत गेलो होतो. मात्र, त्यांची भेट घेणे प्रकृतीच्या दृष्टीने योग्य नाही. कारण त्यांना आता विश्रांतीची गरज आहे.
अंतो, आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. अंतो म्हणजे उदय उत्सव. जगदंबे उदयोत्सव, उदयोत्स. जगदंबे, तुझाच उदय होवू दे, तुझाच उदय होवू दे, अशी आपली प्रार्थना आहे, असे शिवशाहीर पुरंदरें म्हणाले.
बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आपल्या प्रार्थनेचा हा प्रतिसाद आहे. त्यांना उदंड आयुष्य मिळो. ते पुन्हा पहिल्यासारखे आपल्याला दिसतील, अशी अपेक्षा पुरंदरे यांनी व्यक्त केली.