महाराष्ट्राची मोठी हानी – सचिन तेंडुलकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची मोठी हानी झाली असल्याचेही सचिनने ट्विटरवर म्हटले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 17, 2012, 07:59 PM IST

www.24taas.com, मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. आज दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांच्या निधनामुळे समस्त शिवसैनिक आणि मनसैनिकासह संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगरच कोसळलाय.
महाराष्ट्राची मोठी हानी – सचिन तेंडुलकर
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची मोठी हानी झाली असल्याचेही सचिनने ट्विटरवर म्हटले आहे.
बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहता येत नाही म्हणून खूप दुःख होत असल्याचेही तेंडुलकरनेही म्हटले आहे.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याम निधनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शोक व्यक्त् केला आहे.
अवघा महाराष्ट्रत पोरका झाला-लता मंगेशकर
मराठी माणसाच्या नेत्याचे निधन झाल्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. मराठी माणूस अनाथ झाला आहे, अशा भावना सुप्रिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहे. बाळासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत होते. त्यांच्या निधनामुळे तमाम मराठी बांधव शोकसागरात बुडाले आहेत.

- ठाकरे कुटुंब आणि मंगेशकर कुटुंब यांच्यात अनेक वर्षांपासून स्नेहपूर्ण संबंध होते. दोन्ही कुटूंबात जिव्हाळ्याचा घरोबा होता. मी जेव्हा त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनाच मला हसवून हसवून हैराण केले होते. बाळासाहेब त्यांच्या मिश्किल शैलीतून नेहमी माझ्या स्मरणात राहणार आहे. - आशा भोसले
- बाळासाहेब ठाकरे गेल्या काही दिवसांपासून एका योद्धयाप्रमाणे मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या मृत्यूमुळे मराठी माणसाचा कैवारी हरपला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी आणि ठाकरे कुटूंबियांना हे संकट सहन करण्याची ताकद मिळावी, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना... अशा शब्दात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना श्रद्धाजंली अर्पण केली. - नरेंद्र मोदी
- माननीय बाळासाहेब ठाकरे अजून जिवंत राहतील असे वाटत होते. हा माणूस डरपोक कधीही नव्हता. या माणसाला भीती ही कधी माहितीच नव्हाती. बाळासाहेबांनी विशिष्टु विचाराने आपली भूमिका मांडली आणि अखेरपर्यंत आपल्या विचारांशी ते एकनिष्ट राहिले. आपल्या विचारांशी पक्के त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आहे. दिलदार वृत्तीचा नेता बाळासाहेबासारखा एक झंझावात निघून गेला. माझ्या अत्यंत ते जवळचे होते. मी मुख्यमंत्री असतानाही आमची भेट व्हायची. मुख्यमंत्री असताना जेव्हाही मी चांगले काम करायचो तेव्हा ते पाठिंबा द्यायचे. मी त्यांच्या घरी जायचो. आमचे कधी-कधी वादही व्हायचे. परंतु, ते क्षणिक असायचे. - सुशीलकुमार शिंदे (केंद्रीय गृहमंत्री)