www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
घरांच्या किंमती गगनाला भिडत असल्यामुळे सामान्य मुंबईकरांना घर घेणं म्हणजे एकप्रकारे दिव्यच वाटू लागलंय. बॉलीवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चनसाठी मात्र हे दिव्य पार करण सहज सोपं आहे. त्यांनी नुकताच जुहूमध्ये एक बंगला विकत घेतलाय. त्यांनी विकत घेतलेला जुहू भागातील हा पाचवा बंगला आहे.
साधारण ८०० एकर च्या प्रॉपर्टीसाठी त्यांनी ५० करोड रुपये मोजलेत. मुंबईतला अमिताभ यांचा सर्वात पहिला बंगला ‘प्रतीक्षा’ त्यानंतर ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाच्या प्रोड्युसरकडून त्यांना ‘जलसा’ हा बंगला गिफ्ट म्हणून मिळाला. ज्यामध्ये सध्या ते राहत आहेत. ‘जलसा’मध्ये ‘चलते चलते’ या हृषिकेश मुखर्जी यांच्या सिनेमाचं शूटिंगही करण्यात आलं होतं. २००४ मध्ये त्यांनी तिसरा ‘जनक’ नावाचा बंगला खरेदी केला. जो सध्या त्याचे कुटुंब ऑफिस म्हणून वापर करत आहेत. त्यांचा ‘वत्स’ हा बंगला सिटी बॅंकला भाड्याने देण्यात आला आहे.
अमिताभ यांचा नवीन बंगला ‘जलसा’ या बंगल्याच्या पाठीमागेच आहे. त्यांचा ‘नैवेद्य’ नावाचा आणखी एक बंगला अभिषेकच्या नावावर आहे. अभि-ऐशच्या ते ‘नैवेद्य’मध्ये राहतील, अशी चर्चाही केली जात होती. शत्रुघ्न सिन्हा यांनीही त्यांच्या ‘रामायण’ या बंगल्याच्या जागेवर मल्टिस्टार इमारत उभी केलीय. ज्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब राहतं. ज्यावेळी त्यांच्या घराचे काम चालू होते त्यादरम्यान ते लोखंडवाला येथील अमृता सिंग यांच्या घरी राहायला होते.
सध्या बॉलीवूडचे जुने अभिनेते आपले बंगले बिल्डरला विकून काही रक्कम आणि फ्लॅट विकत घेतायत. मात्र ‘अमिताभ बच्चन’ आणि ‘धर्मेंद्र’ हे दोन्ही अभिनेते याला अपवाद आहेत. त्यांनी अजून आपले बंगले कोणत्याही बिल्डरला विकलेले नाहीत याउलट अमिताभ बच्चन तर त्यांच्या बंगल्यांची संख्या वाढवतच आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.