www.24taas.com, मुंबई
‘ब्लॅक’ सिनेमाच्या एका दृश्यात माझ्या हातून घोडचूक झाली असल्याची कबूली नुकतीच बिग बीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. आजही तो प्रसंग बघताना ती चूक बघण्यात आली तर माझं मन सुन्न होतं असं बिग बीनीं स्पष्ट केल आहे.
२००५ साली प्रदर्शित झालेला ब्लॅक सिनेमाच्या डायनिंग टेबलच्या एका प्रसंगात बिग बींकडून खूप मोठी चूक झाली असल्याचा खुलासा खुद्द बीग बीने केली आहे. मात्र ‘ती’ चूक कोणाच्याही लक्षात येणार नाही असं त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं आहे.
ह्या चित्रपटात बीग बींनी एका अंध आणि कर्णबधीर मुलीच्या शिक्षकाची भूमिका निभावली होती. आपली विद्यार्थिनी राणी मुखर्जीच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी बच्चन हे तिचे भाषण वाचतात असा हा प्रसंग चित्रित करण्यात आला आहे.
फ्लोरेन्स येथे नुकत्याच झालेल्या रिव्हर टू रिव्हर महोत्सवात ‘ब्लॅक’ला ओपनिंग फिल्म म्हणून निवडण्यात आले. तेथे हा चित्रपट पाहताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या हातातून चूक झाल्याचे उघड केले. ‘मी जेव्हा जेव्हा ते दृश्य पाहतो तेव्हा तेव्हा मी कमालीचा अस्वस्थ होतो.
माझी ही चूक माझ्याप्रमाणे दुसऱ्यांच्याही नजरेस पडली आहे की काय हे मी जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, परंतु काही कारणास्तव ही चूक इतर कुणाच्या लक्षात आली नाही, असे जेव्हा आपल्याला कळले तेव्हा क्षणभर का होईना मला बरं वाटलं आणि ती चूक कोणाचाही लक्षात येणार नाही ’ असं त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
व्हिडिओ पाहा आणि अमिताभची चूक शोधून काढा :