ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन

भारदस्त आवाज आणि रांगडं व्यक्तीमत्व..असं ज्यांचं वर्णन केलं जातं, ते अभिनेते कुलदीप पवार यांचं आज मुंबईत निधन झालंय. गेल्या आठवडाभरापासून कुलदीप पवार यांना अंधेरीतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 24, 2014, 11:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारदस्त आवाज आणि रांगडं व्यक्तीमत्व..असं ज्यांचं वर्णन केलं जातं, ते अभिनेते कुलदीप पवार यांचं आज मुंबईत निधन झालंय. गेल्या आठवडाभरापासून कुलदीप पवार यांना अंधेरीतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. मालिका, नाटक आणि अनेक सिनेमा अशा तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या कुलदीप पवार यांच्या अशा अकाली जाण्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय.

मराठी चित्रपटसृष्टीकले ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन झालयं. भारदस्त आवाज आणि आकर्षक रांगडे व्यक्तीमत्व यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
गेली काही दिवस प्रकृती अस्वास्थामुळे पवार य़ांना कोकीळाबेन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोल्हापूरहून मुंबईत आलेल्या कुलदीप पवार यांना पणशीकरांनी इथे ओशाळला मृत्युमधून संभाजी रंगवण्याची संधी दिली. नजरेतील जरब आणि आवाजातला खर्जेपणा यामुळे कुलदीप पवार प्रसिद्धीस पावले..मर्दानी पासून प्रवास सुरु केलेल्या पवारांनी त्यानंतर गुपचुप गुपचुप, आली लहर केला कहर, गोष्ट धमाल नाम्याची, आई तुळजाभवानी, दुध का कर्ज, जीत, जावयाची जात, दरोडेखोर, बिन कामाचा नवरा, अरे संसार संसार, शापीत, सरजा, एकापेक्षा एक, वजीर, अरे देवा, खरा वारसदार तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महागुरु यासारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका परमवीर मधली त्यांची भूमिकाही गाजली ..चित्रपटाबरोबरच हॅण्डसअप, गोलमाल आणि पती सगळे उचापती यासारख्या नाटकांनी त्यांनी रंगभूमीवरही आपली छाप सो़डली होती..नुकत्याच झालेल्या फु बाई फु च्या महाअंतिम सोहळ्यात त्यांनी सिनिअर कट्टा मध्ये सिनेसृष्टीमधील आपल्या आठवणींना उजाळा दिला होता...त्यांची ही अकाली एक्झीट रसिकांच्या मनाला चटका लावून गेली...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.