आशिया कप : पाक'नं गाठली अंतिम फेरी, भारत घरी!

पाकिस्ताननं अटीतटीच्या सामन्यात बांग्लादेशला तीन विकेटसनं पराभूत केलंय. त्यामुळे, भारत आता साहजिकच आशिया कपमधून बाहेर पडलाय. आशिया कपमधली फायनल मॅच आता पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 5, 2014, 10:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर (ढाका)
पाकिस्ताननं अटीतटीच्या सामन्यात बांग्लादेशला तीन विकेटसनं पराभूत केलंय. त्यामुळे, भारत आता साहजिकच आशिया कपमधून बाहेर पडलाय. आशिया कपमधली फायनल मॅच आता पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान होणार आहे.
`आशिया कप`च्या १२ व्या सत्रातली शेवटची मॅच श्रीलंका आणि गतवर्षीची चॅम्पियन टीम पाकिस्तान यांदरम्यान खेळली जाणार आहे.
पाकिस्ताननं मंगळवारी शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या आपल्या चौथ्या मॅचमध्ये बांग्लादेशला तीन विकेटनं मात दिलीय. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय आहे. बांग्लादेशनं पाकिस्तानसमोर ३२७ रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.
उत्तरादाखल उतरलेल्या पाकिस्तानी टीमनं ४९.५ ओव्हर्समध्ये सात विकेट गमावत विजयश्री खेचत आणला. पाकिस्तानच्या विजयाचे हिरो ठरलेले शाहिद आफ्रिदीनं तुफानी वेगात ५९ रन्स ठोकले. त्याला 'मॅन ऑफ द मॅच' किताबानं गौरवण्यात आलं. त्याशिवाय अहमद शहजाद यानं १०३ आणि फवद आलम याने ७४ रन्सचं योगदान दिलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.