www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अखेर आडमुठ्या एन. श्रीनिवासन यांना मवाळ भूमिका घेण भाग पडल आहे. वाढता विरोध आणि कायदेशीर पेच यांना घाबरून दिल्लीत होणारी बीसीसीआय वर्किंग कमिटीची मीटिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जगमोहन दालमियाच बीसीसीआयच्या अंतरिम अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.
हेकेखोर श्रीनिवासन अखेर बॅकफूटवर
बंडाच्या भीतीनं गुंडाळली बीसीसीआयची मीटिंग
एन. श्रीनिवासन यांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी पुन्हा विराजमान होण्यासाठी उतावीळ असलेल्या श्रीनिवासन यांच्याविरोधात वाढता विरोध पाहता बीसीसीआयची वर्किंग कमिटीची मीटिंग रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती अवैध असल्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर श्रीनिवासन यांनी मीटिंगच अध्यक्षस्थान भूषवलं तर कायदेशीर पेच निर्माण होईल या भीतीमुळे बीसीसीआयमध्ये दोन गट निर्माण झाले होते. श्रीनिवासन यांच्याविरुद्धचा गटही सक्रिय झाला होता..एकीकडे कायदेशीर पेच तर दुसरीकडे बंडाची भीती यामुळे श्रीनिवासनं यांची भूमिकाही मवाळ झाली...आणि बीसीसीआयने ही मीटिंगच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
हेकेखोर श्रीनिवासन अखेर बॅकफूटवर
जगमोहन दालमियाच आता बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. फिक्सिंगप्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा मुंबई हाय कोर्टाच्या निर्णयाविरोधात आता बीसीसीआय सुप्रीम कोर्टात जाणार आहे. एकमात्र नक्की श्रीनिवासन यांना तूर्तास तरी बॅकफूटवर जाण भाग पडलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.