www.24taas.com, नवी दिल्ली
सचिन तेंडुलकरच्या उंचीवर जाऊ नका ५ फु़ट ६ इंच उंचीच्या या छोट्या फलंदाजात ‘टायगर’ दडलेला आहे, हे उद्गार आहेत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मँथ्यू हेडन याचे. विमलकुमार यांच्या `सचिन क्रिकेटर आँफ द सेंच्युरी` या पुस्तकात हेडनने लेख लिहिला आहे. त्यात सचिनवर हेडनने स्तुतिसुमने उधळलीत.
मी सचिनचे नाव सर्वप्रथम नव्वदीच्या दशकात ऐकले होते. तेव्हा या छो़ट्या खेळाडूत धावांचे कोठार, ‘फ़टक्याचा तोफखाना’ कसा आहे, असा प्रश्न मला पडायचा. परंतु मी जेव्हा या महान फलंदाजाविरूद्ध प्रथम खेळालो तेव्हा मला जाणवलं, त्याच्या उंचीवर जाण्यात काही अर्थ नाही. त्याच्यात समोरच्या गोलंदाजाचा फडशा पाडणार टायगर दडून बसलाय, असे हेडनने या लेखात लिहिले आहे.
मोहाली कसोटीत या महान फलंदाजाने सवाधिक कसोटी धावांचा विश्वविक्रम मोडला. त्या क्षणाचा साक्षीदार मी होतो. सचिनच्या या कामगिरीनंतर मोहालावर चक्क २० मिनिटांपर्यंत फटाक्याची आताषबाजी सुरू होती. एक छोट्या चणीचा खेळाडूचा क्रीडा विश्वात किती उत्तुंग उंचीवर पोहोचला आहे, हे मी मोहालीला अनुभवले, असे हेडनने स्पष्ट केले.