www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टसाठी वानखेडेवर जोरदार तयारी सुरु आहे. सचिनची आई त्याची अखेरची टेस्ट पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असणार आहे.
सचिनच्या आईसाठी वानखेडेवर खास रॅम्प तयार करण्याचं काम सुरु आहे. सचिन वानखेडेवर जोरादार सराव तर करतोच आहे शिवाय त्याच्या आईसाठी सुरु असलेल्या खास तयारीवरही सचिनचं लक्ष आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली शेवटची कसोटी आपल्या आईला बघता यावी यासाठी वानखेडे स्टेडियमवरच्या `प्रेसिडेंट बॉक्स`पर्यंत आईला व्हील चेअरवरून आरामात नेता यावं, यासाठी प्रवेशद्वारापासून या बॉक्सपर्यंत रॅम्प बनवण्याची विनंती त्यानं एमसीएला केली आहे.
मुंबई रणजी संघासोबत सराव करण्यासाठी सचिन तेंडुलकर सोमवारी वानखेडे स्टेडियमवर आला होता. त्यावेळी सचिननं मुंबई क्रिकेट असोसिएनच्या पदाधिकाऱ्यांशी रॅम्पबाबत चर्चा केली. तेव्हा, एमसीएनं त्याला सध्याच्या तात्पुरता रॅम्प दाखवला. पण तो त्याला फारसा आवडलेला नाही. त्यामुळे त्यात लवकरच सचिनच्या सूचनेप्रमाणं बदल केले जाणार असल्याचं समजतंय.
क्रिकेट देव सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेतोय. त्यामुळं सचिनच्या सेंड ऑफची जोरदार तयारी सुरू आहे. तर मातृभक्त सचिन आपल्या आईला हा सामना निट बघता यावा यासाठी तयारी करतोय.
पाहा व्हिडिओ
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.