www.24taas.com, झी मीडीया, हैदराबाद
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शेवटचे पाच बळी अवघ्या 33 धावांत गमाविल्याने कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव 305 धावांतच आटोपला.
पहिल्या दिवशी महाराष्ट्राने आपल्या भक्कम फलंदाजीचा पुरेपूर फायदा घेतला नाही. हेच चित्र गुरूवारी दुसऱ्या दिवशीही पहायला मिळाले.
नाबाद असलेला अंकित बावणे मिथुनच्या गोलंदाजीवर 89 धावांवर त्रिफळाबाद झाला. त्यापाठोपाठ श्रीकांत मुंढेहा लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला. अनुप संकलेचाने अर्धशतक झळकावले.
मात्र अर्धशतकानंतर तो लगेच यष्टीरक्षकाकडे झेल देवून बाद झाला आणि अखेर महाराष्ट्राचा डाव 305 धावांत संपुष्टात आला.
कर्नाटककडून कर्णधार विनय कुमार, अरविंद आणि अभिमन्यू मिथुन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले.
पहिल्या दिवशी, हुकमी फलंदाज केदार जाधव पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला, मात्र इतर फलंदाज जम बसल्यानंतर एकाग्रता ढळल्याने बाद झाले.
यातही 14 धावांवर जीवदान मिळालेल्या चिराग खुराणाची 64 धावांची खेळी खाली राहिलेला चेंडू स्विप करण्याच्या प्रयत्नात संपुष्टात आली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.