www.24taas.com झी मीडिया, मुंबई
सचिन तेंडुलकर आता आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर निवृत्ती घेईल, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. याबाबत सचिनचा जूना सहकारी म्हणजेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला विचारले असता त्याने अगदी वेगळे उत्तर दिले.
गांगुली म्हणाला की, ``तो त्याचा निर्णय आहे. त्याने क्रिकेटला खूप काही दिले आहे. त्याच्या उम्मेदीच्या काळात मी त्याच्यासोबत खेळलो आहे. त्याच्याकडून मला अनेक सल्लेही मिळाले. तो जे काही करतो त्याने त्याच्या कुटुंबाला अणि देशाला अभिमान वाटते. तो भारत `रत्न` आहे.`` इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या पराभवानंतर आगामी परदेशातील दौऱ्यात हरवलेली लय पुन्हा गवसण्याची संधी भारतीय संघाकडे असेल, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले.
आता या दौऱ्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतून होणार आहे. भारतीय संघ वन डे मध्ये चांगली कामगिरी करतो. पण वन डे मध्ये चांगली कामगीरी केली असली तरी कसोटीत संघाचा आलेख उतरता असल्याचे गांगुलीला वाटत नाही. भारतीय संघाला थोडा वेळ देण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये संघाचा पराभव झाला असला तरी आता आगामी दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कामगिरी सुधारण्याची संधी संघाला मिळाली आहे. वन डे त चांगली खेळी खेळत असणाऱ्या आपल्या संघाने कसोटीतही काही वेळा चांगले निकाल दिले आहेत.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापुर्वी गांगुलीने धोनीला काही सल्ला दिला. धोनी याआधीही आफ्रिकेत खेळला आहे. हा दौरा अधिक कठीण असल्याची धोनीला कल्पना आहे. आफ्रिका आपल्या घरच्या मैदानावर नेहमीच यश मिळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे भारतीय संघाला चांगला खेळ करावा लागेल. त्यामुळे धोनीने याकडे अधिक लक्ष देऊन हा खेळ सकारात्मक करावा, असं गांगुलीला वाटते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.