तिकीटांच्या माध्यमातून सचिनला सलाम

वानखेडवर सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट करिअरमधील अखेरची टेस्ट खेळणार आहे. या टेस्टसाठी आजपासून तिकीटविक्रीला सुरुवात झालीय. सचिनला सलाम करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं या तिकीटांच्या माध्यमातून सचिनला सलाम ठोकला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 12, 2013, 08:09 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वानखेडवर सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट करिअरमधील अखेरची टेस्ट खेळणार आहे. या टेस्टसाठी आजपासून तिकीटविक्रीला सुरुवात झालीय. सचिनला सलाम करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं या तिकीटांच्या माध्यमातून सचिनला सलाम ठोकला आहे.
या तिकींटावर सचिनचा रेकॉर्डही छापण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पाचव्या दिवसाच्या तिकीटावर सचिनचा वेगळा फोटोही छापण्यात आलाय. पण सकाळपासूनच ही वेबसाईट हँग झाली होती. त्यामुळे सामान्य क्रिकेट चाहत्यांना ज्यांना सचिनची अखेरची टेस्ट पाहायचीय त्यांना चांगलाच त्रास होतोय. www.kyazoonga.com या वेबसाईटवर सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाली. मात्र, पोर्टल ओपन होण्यास विलंब झाल्याने सचिनचे चाहते नाराज झालेत.
वानखेडेवर येत्या १४ नोव्हेंबरपासून सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट करिअरमधली अखेरची टेस्ट खेळणारेय. त्या टेस्टच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री करण्यात येणार असं सांगताच सचिनच्या चाहत्यांनी साईटवर एकच गर्दी केली. तिकिटासाठी सचिनच्या जवळपास दोन कोटी चाहत्यांनी एकाचवेळी साईट ओपन केल्याने ती क्रॅश झाली. याबद्दल एमसीएने दिलगिरी व्यक्त केली. काही वेळाने ही साईट सुरळीत करण्यात आली. त्यामुळे उशीरा का होईना लोकांना ऑनलाइन तिकीट मिळालीत. साईटवर ऑनलाइन तिकीटासाठी ट्राय करत राहा, असं आवाहन एमसीएचे खजिनदार विनोद देशपांडे यांनी केलंय.
सचिन चाहत्यांसाठी केवळ पाच हजार तिकीट असल्यानं चाहते एमसीएवर प्रचंड नाराज आहेत. वानखेडेची आसनक्षमता ३२ हजारांची असताना सामान्यांना केवळ ५ हजारच तिकीट का हा सवाल उपस्थित होताय. क्लब्सना, बीसीसीआयला आणि आयसीसीला आणि व्हीआयपींसाठी तिकीटे उपलब्ध होतात. मग सामान्यांना अशी वागणूक का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हि़डिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.