www.24taas.com, लाहोर
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान सुनील गावस्कर आता प्रस्तावित पाकिस्तान प्रीमियर लीग ट्वेंटी-२० टूर्नामेंटच्या आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मदत करणार आहे. पीसीबीनं पाठवलेलं पाकिस्तान भेटीचं आमंत्रण गावस्कर यांनी स्वीकारलंय.
पाकिस्तान मीडियानं ही माहिती दिलीय. पीसीबी अध्यक्ष जका अशरफ यांनी श्रीलंकेमध्ये गावस्कर आणि माजी पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रम यांची भेट घेऊन त्यांना प्रस्तावित ‘टी-२० लीग’साठी मदत करण्यासाठी विचारणा केली होती. असोसिएट प्रेस ऑफ पाकिसतान (एपीपी)च्या म्हणण्यानुसार, जका अशरफ यंनी गावस्कर यांच्याशी पाकिस्तान प्रीमियर लीगसंबंधी बरीच चर्चा केली होती. गावस्कर यांनी या स्पर्धेला यश मिळवून देण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. पाकिस्तान क्रिकेटच्या विकासासाठी एक चांगलं हे एक चांगलं पाऊल असेल तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी पीपीएलचं आयोजन पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचं ठरेल, असं गावस्कर यांनी म्हटलंय.
‘एपीपी’नुसार, अशरफ यांनी सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलं आणि या आमंत्रणाचं गावस्कर यांनी स्वीकारदेखील केलाय. सोबतच त्यांनी पासीबी अध्यक्षांना पीपीएलच्या आयोजनाच्या मदतीसाठी माजी टेस्ट क्रिकेटपटूंना पाकिस्तानात आणण्याचंदेखील आश्वासन दिलंय.