www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ब्युरो
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स टीम इंडियाचे क्रिकेटर्स केवळ मैदानातच हिरो नाहीत.. तर मैदानाबाहेरही त्यांची ऍक्शन कायम असते... प्रत्येक विजयानंतर जल्लोष साजरा करणा-या टीम इंडियाने आता केवळ एकच गुरूमंत्र अंगिकारला आहे... आणि तो म्हणजे `टेन्शन लेनेका नही... टेन्शन देनेका...`
या क्रिकेटर्सची स्टाईल जरा हटके आहे... मैदानात जगज्जेत्यांच्या आवेशात वावरणा-या या क्रिकेटर्सचा अंदाज मैदानाबाहेरही कायम असतो... त्यांच्या या मैदानाबाहेरील अशा बिनधास्त... बेधडक वर्तणुकीचा त्यांच्या मैदानातील कामगिरीवर अजिबात परिणाम होत नाही... कारण त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे...
मैदानात जेव्हा परफॉर्म करण्याची वेळ येते तेव्हा सर्वचजणं एक से बढकर एक परफॉर्मन्स देतात... झिम्बाब्वेला घरच्याच मैदानात धोबीपछाड दिल्यानंतर आफ्रिकन सफारी एन्जॉय करण्यातही यंगिस्तानमध्ये चुरस होती... कॅप्टन कोहली असो अथवा सुरेश रैना... रवींद्र जाडेजा असो अथवा यंगिस्तानचे मोहम्मद शमी आणि मोहित शर्मासारखे नवखे चेहरे... सर्वांनीच मिळालेल्या संधीचा पूरेपूर लाभ उठवला... बोन फायरची मजा अनूभवताना त्यांनी मैदानातील बिनधास्तपणा सफारीतही दाखवला...
टीम इंडिया दडपणाखाली परफॉर्म करत नाही असे आरोप काही वर्षांपूर्वी टीमवर होत असत... तेव्हा प्लेअर्स हे केवळ मैदानात हजेरी लावण्याचंच काम करतात असेही आरोप झाले... मात्र भारतीय टीमचा चेहरा-मोहरा आता पूर्णपणे बदललेला आहे... आणि त्याला कारण म्हणजे टीम इंडियाचा नवा फंडा... टेंशन लेनेका नाही.. टेंशन देनेका...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.