www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर (ढाका)
टीम इंडिया वर्ल्डकप टी-२० च्या फायनलमध्ये दाखल झालीय. शुक्रवारी, झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटनं पछाडलंय. आता भारताचा फायनल मुकाबला ६ एप्रिल रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. विराट कोहलीनं शेवटचा चौकार ठोकून विजय खेचून आणला.
दक्षिण आफ्रिकेनं समोर ठेवलेल्या १७२ रन्सचा पाठलाग करताना रोहीत शर्मा २४ रन्स, अजिंक्य रहाणे ३२ रन्स, युवराज सिंग १८ रन्स, सुरेश रैना २१ रन्स आणि विराट कोहलीनं ७२ रन्सची भागीदारी केली.
भारताकडून अश्विननं चार ओव्हर्समध्ये २२ रन्स खर्च करून तीन विकेट घेतले. कुमारला एक विकेट मिळाला. परंतु, ग्रुप स्तरावरचा हिरो ठरलेल्या अमित मिश्रानं तीन ओव्हर्समध्ये ३६ रन्स विरोधी टीमला दिले. मोहित शर्मानंही तीन ओव्हर्समध्ये ३४ रन्स दिले.
श्रीलंकेनं गुरुवारी वेस्टइंडिजला २७ रन्सनं पछाडत फायनलमध्ये जागा बनविली होती. या सामन्याचा निर्णय डकवर्थ-लेविसच्या नियमांनुसार झाला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.