www.24taas.com, मुंबई
यंदापासून तंत्रशिक्षण संचालनालयानं स्वायत्त आणि बिगर स्वायत्त अभ्यासक्रमांच्या प्रवेश फे-या एकत्रच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन्ही महाविद्यालयांचा पसंतीक्रम देता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार योग्य महाविद्यालय देण्यात येईल अस तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत स्पष्ट करण्यात आलंय.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या आणि दुस-या फेरीच्या पसंतीक्रम अर्जात प्रत्येकी 100 विकल्प भरण्याची संधी यंदा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. तिसरी फेरी समुपदेशन पद्धतीनं घेण्यात येईल. पहिल्या फेरीत भरलेल्या विकल्पांपैकी पहिल्या तीन विकल्पांतील महाविद्यालय मिळाल्यास तिथे विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागेल.
दुस-या फेरीत मात्र भरलेल्या विकल्पांतील मिळेल त्या महाविद्यालयात सक्तीनं प्रवेश घ्यावा लागेल. दुस-या फेरीपर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तिस-या समुपदेशन फेरीत प्रवेश घ्यावा लागेल.