बँकेने ठोकलं शाळेला सील, विद्यार्थी शाळेबाहेर

नाशिकमधल्या दरी गावच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सध्या शाळेबाहेरच धडे गिरवावे लागतायत. कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेनं शाळेला सील ठोकलंय. बँक आणि शाळेच्या वादाची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळतेय.

Updated: Jul 19, 2012, 10:36 PM IST

www.24taas.com, नाशिक

नाशिकमधल्या दरी गावच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सध्या शाळेबाहेरच धडे गिरवावे लागतायत. कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेनं शाळेला सील ठोकलंय. बँक आणि शाळेच्या वादाची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळतेय.

नाशिकमधल्या दरी गावातली आनंद एज्युकेशन सोसायटीच्या शाळेला कर्ज फेडलं नाही म्हणून दहा दिवसांपूर्वी सील ठोकलं. हक्काची शाळा परत मिळावी म्हणून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्ज फे़डण्यासाठी तयार आहोत, पण नामको बँक सहकार्य करत नसल्याचा शाळा प्रशासनाचा आरोप आहे.

१९९८ साली शाळेनं नामको बँकेकडून २० लाखांचं कर्ज घेतलंय. त्याची परतफेड न झाल्यानंच दंडाधिका-यांच्या आदेशानंच सील ठोकण्याची कारवाई केल्याचं बँकेंचं म्हणणं आहे. शाळेला सील असल्यानं विद्यार्थी व्यायामशाळेत तर कधी समाजमंदिरात शिक्षणाचे धडे गिरवतायत. शाळा प्रशासन, बँक, कोर्ट कचे-या या सगळ्यामध्ये नुकसान होतंय ते विद्यार्थ्यांचं.