www.24taas.com, ठाणे
आयसीएसई आणि आयएससी बोर्डानं आज आपले १० वी आणि १२ वीचे निकाल जाहीर केले. या परिक्षेत ठाण्याच्या शलाका कुलकर्णी आणि धनबादच्या माधवी सींगनं १० वीच्या परिक्षेत भारतातून पहिला क्रमांक पटकावला.
ठाण्यातील सुलोचना देवी सिंघानीया शाळेची ती विद्यार्थीनी आहे. या परिक्षेत तीनं ९८.८० टक्के गुण मिळवले आहेत. यावर्षी १ लाख ३२ हजार २८२ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.
या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व परिक्षार्थींमध्ये यावेळी ९९.१५ टक्के मुली तर ९८.१९ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. तर आयएससीच्या १२ वीच्या निकालात दुबई मॉडेल इंग्लिश स्कुलच्या रोहन संपतनं ९९.५० टक्क्यांसह पहिला क्रमांक पटकावला. यावर्षी ५९ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिलेली होती.